माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सर्वगोड यांचे मानले आभार
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर आणि आदर्शनगर येथून जानवली गावाला जोडणारे गणपतीसाना येथील ब्रिज मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी तत्परतेने प्रशासकीय सहकार्य केले. त्यासाठी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचे कणकवली शहरवासीयांच्या वतीने आभार मानत असल्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सांगितले.गेली कित्येक वर्षे कणकवली शहरातील उत्तर भागातील जनता आणि जानवली वासीयांची गणपती सान्यावर ब्रिज व्हावा अशी मागणी होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ब्रिज ची संकल्पना पूर्ण होत नव्हती. आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यासाठी पूर्ण सहकार्य केले. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याकडून लागणारे सर्व प्रकारचे तांत्रिक सहकार्य अत्यंत तत्परतेने मिळाले. त्यामुळे हा ब्रिज मंजूर होऊ शकला. त्यासाठी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचे आभार मानत असल्याचेही नलावडे- हर्णे यांनी सांगितले.













