अयोध्येत होणाऱ्या श्रीराम लल्ल्यांच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त वेताळ बांबर्डे येथील श्रीराम मंदिरात केंद्रीय मंत्री मान. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थित विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ (प्रतिनिधी) : २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राची प्रतिष्ठापना होणार आहे. संपूर्ण भारत देशात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेताळ बांबर्डे येथील श्रीराम मंदिरात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कोकणचे सुपुत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टी कुडाळ तालुक्याच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.

वेताळ बांबर्डे येथील श्रीराम मंदिर हे १०५ वर्षे जुने असून त्या मंदिरात प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांच्याबरोबरच हनुमंताची देखील मूर्ती आहे. या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये भगवान लक्ष्मणांची मूर्ती नाही. भगवान लक्ष्मणांची मूर्ती नसलेलं हे भारतातलं पहिलंच मंदिर असल्याचा दावा या मंदिराचे प्रमुख विठ्ठल सामंत यांनी केला आहे. या मंदिराचे प्रमुख सामंत कुटुंबीय आणि या मंदिराचे तुळशी वृंदावन एकच असून दररोज त्याची विधिवत पूजा केली जाते.

उद्या सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी वेताळ बांबर्डे येथील या श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. तेव्हा जास्तीत जास्त राम भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!