बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बांदिवडे ग्रामस्थ संघ स्थानिक समितीच्या वतीने बांदिवडे शाळा येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ३० रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी सरपंच अनंत मयेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी सुखसे, डॉ. यादव बांदिवडे ग्रुप विकास सोसायटी अध्यक्ष प्रफुल्ल प्रभू, राजेंद्र मोरवेकर, आरोग्य सेविका सौ. दीप्ती पोवळे, तंटामुक्ती अध्यक्ष शाहू लखन बांदिवडेकर, समाजसेवक मिलिंद चव्हाण, बांदिवडे ग्रामस्थ संघाचे अध्यक्ष आनंद परब, उपाध्यक्ष विलास परब, सचिव उदय सावंत, खजिनदार अजय घाडीगावकर, उमेश परब, राजेंद्र साळकर, संजय जोशी, सत्यवान सावंत, चंद्रकांत परब, अनिल परब, रंजन प्रभू, सतीश आईर, सुनील घाडी,अजय घाडीगावकर, रामचंद्र माळकर, विश्वनाथ परब, मिलिंद चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
रक्तदान शिबीर आयोजित करून रुग्ण सेवेत मोलाचे योगदान दिल्याबद्दल बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने आनंद परब यांना सन्मान पूर्वक प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये विनय घाडीगावकर, सुभाष साटम, दशरथ वराडकर, नरेश सावंत, संतोष परब, उमेश श्रावणकर, अभिजीत घाडीगावकर, अजय घाडीगावकर, तुषार चव्हाण, अमोल कदम, आदर्श जाधव, मृणाल परब, अनुष्का परब, दिनेश परब, सीमा लटके, लक्ष्मण घाडीगावकर, हर्षल प्रभू, शैलेश राणे, शाहूलखन बांदिवडेकर, सुबोध चव्हाण, अमोल परब, रामचंद्र माळकर, किरण पवार, प्रसाद वरक, ऋषिकेश जाधव, संजय राणे, गणेश माळकर, कमलेश परब, वासुदेव परब, मयुरेश राणे आदींनी रक्तदान करत शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.













