भाजपा नेते निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण जेटी येथे प्रभू श्रीरामांची ३० फूट उंच भव्य प्रतिमासाकार

मालवण जेटी परिसरात २५ हजार विद्युत दिव्यांची रोषणाई

मालवण (प्रतिनिधी): अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या निमित्ताने भाजपा कुडाळ मालवण निवडणूक प्रमुख श्री. निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण जेटी येथे प्रभू श्रीरामांची ३० फूट उंच भव्ह प्रतिमा साकारण्यात आली असून मालवण जेटी परिसरात २५ हजार दिव्यांची रोषणाई देखील करण्यात आली आहे. आज सायंकाळी निलेश राणे यांनी मालवण जेटी येथे साजरा होत असलेल्या उत्सव सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवली होती यावेळी माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, मालवण माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, नगरसेवक दीपक पाटकर, अप्पा लूडबे, पूजा करलकर, पंकज सादये, मंदार लुडबे, ललित चव्हाण आदी पदाधिकारी व मालवण शहरातील श्रीरामभक्त हा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!