कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथे असलेल्या नाग्या महादु वस्तीगृह येथे संचालक उदय आईर यांनी पत्रकार शेखर सामंत यांच्याजवळ मल्लखांब खेळासाठी आवश्यक असलेल साहित्य देण्याची मागणी केली होती त्या नुसार शेखर सामंत यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्याजवळ या संदर्भात चर्चा केली असता निलेश राणे यांनी तत्काळ याची दखक घेत आवश्यक ते साहित्य नाग्या महादू वसतिगृह येथे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. सोबतच इतर क्रीडा साहित्यही लवकरच उपलब्ध केले जाणार असून नाग्या महादू समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण शक्य तेवढ्या सर्व गोष्टी करणार असल्याची खात्री निलेश राणे यांनी दिली. हे साहित्य प्रदान करताना ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, सरचिटणीस देवेंद्र सामंत, प्रणाली घाडी, सारिका कदम, दशरथ कदम, भाई कदम, भावोजी नाईक, निखिल कांदळगावकर, निखिल घोगळे, विघ्नेश घाडी आदी उपस्थित होते.













