हळवल फाटा येथे कारला अपघात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर मुंबई हुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला अपघात झाला. एमएच १४ एफ एस ९८५१ ही कार दुपारी १२: ३० वा. च्या सुमारास पलटी झाली. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार तीन जणांना दुखापती झाल्या असून त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बापू खरात व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

error: Content is protected !!