महिला अत्याचार प्रकरणात 6 महिने जेलमध्ये राहिलेल्या मालंडकर यांनी स्वतःची पत ओळखावी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरी ही सुशिक्षित व विचारवंताची भूमी आहे त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीमध्ये उभे राहण्याचे व निवडून येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वैभव मालडकर यांनी स्वताची कुवत आणि समाजातील आपली लायकी ओळखावी. दोन वर्षापूर्वी कणकवली शहरामध्ये गाजलेल्या तथाकथित स्त्री अत्याचार प्रकरणात सहा महिने सावंतवाडी जेल भोगलेले वैभव मालंडकर विसरले की काय आणि त्यात आणखीन कहर म्हणून फोंडाघाट मध्ये घाट पायथ्याशी आपली हंडी कशा कशा प्रकारे फोडली गेली याची चर्चा व त्याचे चित्रफित साऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने बघितली आहे.
या पुढे अशाप्रकारची टिका करण्याचे धाडस त्यांनी केले तर स्वताला स्वयंघोषित नेता म्हणवनाऱ्या वैभव मालंडकर यांच्या काळ्या कृत्याची लक्तरे कणकवलीच्या नाही तर जिल्ह्याच्या वेशीवर टांगण्यात येतील. असे वक्तव्य कळसुली विभागप्रमुख दिलीप घाडीगावकर यांनी केले आहे.













