कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय येथे करियर मार्गदर्शन शिबिर संपन्न

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अशोक राणे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात आज बुधवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता लेखक, समीक्षक, पटकथाकार व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अशोक राणे यांनी विद्यार्थ्यांना चित्रपट व संबंधित क्षेत्रातील करीयर च्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन प्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत एखादा छंद किंवा आवड जोपासण्याचा सल्ला दिला. शिवाय आपल्या अनुभवातून आपण जे शिकतो त्याचा इतरांना कसा उपयोग होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. सध्याच्या इंटरनेटच्या सोशल मीडियाच्या जगात प्रत्येकाने सतर्क असणे गरजेचे आहे. त्यातील चांगल्या गोष्टी कोणत्या व‌ वाईट गोष्टी कोणत्या यांची पारख करून सोशल मीडियाचा योग्य वापर करावा असा सल्ला दिला. साहित्य, कला, संगीत, चित्रपट, क्रिडा अशा सर्व क्षेत्रातील करीयर च्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत आपल्यातील क्षमता ओळखून त्या संधीचा फायदा घ्यावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मार्गदर्शक अशोक राणे, शरदचंद्र रावराणे.मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक पी.एम.पाटील.व प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!