माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते चिंदर येथे ‘पंचरत्न’ कारसेवकांचा सन्मान…!

चिंदर (प्रतिनिधी) : अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीराम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सोमवारी चिंदर येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. संध्याकाळी चिंदर श्री रामेश्वर मंदिर येथे माजी खासदार निलेश राणे यांनी भेट दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात
विलास श्रीधर हडकर, हरि नारायण चव्हाण, अरुण रामदास सुर्वे, कृष्णा विष्णू वराडकर, देविदास पांडुरंग रावले या पंचरत्न कारसेवकांचा निलेश राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन सहदय सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच धोंडी चिंदरकर, सरपंच स्वरा पालकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उद्योजक दिपक परब, उपसरपंच दीपक सुर्वे, मधुकर पाताडे, विकास पाताडे, संतोष गावकर, संतोष कोदे, मंगेश गावकर, दिगंबर जाधव, देवेंद्र हडकर, जान्हवी घाडी, शेखर पालकर, विठ्ठल पाताडे, सुबोध गावकर, शेखर पालकर, एकनाथ पवार,शशीकांत नाटेकर, अरुण घाडी, भाई तावडे, विश्वनाथ चिंदरकर, बारापाचं मानकरी, रामभक्त ग्रामस्थ, आदी उपस्थितीत होते.

error: Content is protected !!