एन.सी.सी. संचलन व विद्यार्थ्यांची कवायत प्रात्यक्षिके सादर
वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात आज प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने प्रशालेच्या एन.सी.सी कॅडेट चे संचलन तसेच प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी कवायत प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. रंगोत्सव आयोजित रंगभरण स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्य गित व ध्वज गीत गायन केले. वैभववाडी शहरातून वंदे मातरम्..! भारतमाता की जय…! अशा घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, माता पालक संघाचे पदाधिकारी तेजस आंबेकर, अनंत पवार, अनघा पाटील व प्रशालेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














