अचित कदम यांच्या सौजन्याने स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे कडून शाळेला एलईडी टीव्ही संच भेट

कणकवली (प्रतिनिधी) : वरडवे गावचे सुपुत्र, युवा उद्योजक अचित कदम यांच्या सौजन्याने स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परीषद हिवाळेवाडी शाळेला एलईडी टीव्ही संच भेट देण्यात आला. शैक्षणिक उपक्रमासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी टीव्ही संच देण्याची मागणी हिवाळेवाडी जिल्हा परिषद प्रशासनाकडून उद्योजक अचित कदम यांच्याकडे करण्यात आली होती. वरवडे हिवाळेवाडी चे सुपुत्र युवा उद्योजक अचित कदम यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे च्या माध्यमातून हिवाळेवाडी जिल्हा परिषद शाळेला एलईडी टीव्ही संच प्रदान केला. यावेळी उद्योजक अचित कदम, वरवडे गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा ग्रा पं सदस्य प्रदीप कदम, मानसी तेली, ,नारायण बांदल, सुभाष मालकर, सागर राणे, प्रसाद बांदल, तेजस कदम, सोनाली कदम, प्रांजल कदम, वैष्णवी कदम, मंगेश तेली, मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.वैष्णवी कदम, मंगेश तेली शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!