छ.शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खारेपाटण किल्ल्यावर फडकविण्यात आला तिरंगा

खारेपाटण (प्रतिनिधी) : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खारेपाटण किल्ले संवर्धन समिती व एन एस एस विभाग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेकाला सुमारे ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्यावर आज भारतीय प्रजास्ताकदिनी स्वराज्याच्या भगव्या ध्वजाबरोबरच तिरंगा ध्वज देखील खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या शुभहस्ते फडकविण्यात आला.

यावेळी खारेपाटण महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या वतीने खारेपाटण महविद्यालय ते किल्ले खारेपाटण अशी विद्यार्थ्यांसमवेत प्राध्यापकांनी प्रभात फेरी काढली. यानंतर खारेपाटण किल्ल्यावरील प्राचीन दुर्गादेवी मंदिरामध्ये खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्या शुभहस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार करण्यात आला. तर सर्व विद्यार्थ्यांना व शिवप्रेमी नागरिक यांना ऐतिहासिक गड किल्ले संवर्धन व त्याचे जतन करण्याची सामूहिक प्रतिज्ञा प्रा.वसीम सय्यद यांच्या मार्गदर्शनखाली सर्वांना देण्यात आली.

या कार्यक्रमाला खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,माजी सरपंच रमाकांत राऊत,सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव,संतोष पाटणकर, शिवप्रेमी ऋषिकेश जाधव,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुहास राऊत,खारेपाटण शिक्षण संस्थेचे पप्पू रायबागकर,गौरी शिंदे, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राध्यापक व्हंकळी सर, प्रा.शिंदे सर, प्राद्यापिका सौ देसाई मॅडम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी खारेपाटण किल्ल्याविषयी ऐतिहासिक अभ्यासपूर्ण माहिती श्री किल्ले सवर्धनस समितीचे कार्यकर्ते. ऋषिकेश जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. यावेळी भारतीय प्रजासत्ताक दिना बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयघोषाच्या घोषणा देण्यात आल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वसीम सय्यद सर यांनी केले तर आभार मंगेश गुरव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!