चौके (प्रतिनिधी) : जागतिक जल अर्पण दिनानिमित्त जलपूजन व जल उत्सव कार्यक्रम प्राथमिक शाळा साळेल नं २ च्या पटांगणात मोठया दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, तसेच मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी पेंडुर पंचायत समिती सदस्या रिया बावकर, साळेल सरपंच रवींद्र साळकर, उपसरपंच नाना परब, जेष्ठ नागरिक तसेच निवृत्त कस्टम अधिकारी राजाराम गावडे, निवृत्त सुभेदार महेंद्र गावडे ग्रामविकास अधिकारी स्वरा परब. कृषी अधिकारी स्नेहा खोत, केंद्र प्रमुख श्री. सावंत, ग्रा. पा. पु. मालवण चे अभियंता माने, श्री. दाभाडे, राणी लाड, जिल्हा समन्वयक इंदिरा परब, आरोग्य सेवक वेंगुर्लेकर, सत्यवान पवार, अशोक लाड, ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, विवेकानंद पेडणेकर, शिल्पा गावडे, सिद्धी पवार, संपदा गावडे, शाळा साळेल नं. २ च्या मुख्याध्यापिका महाले, अंगणवाडी सेविकाअश्विनी सुकाळे, मदतनीस स्वाती गावडे, माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, माजी सरपंच साबाजी गावडे,भानजी गावडे, जयप्रकाश गावडे, विठोबा गावडे, बापू साळकर, गणेश गावडे, संतोष गावडे, श्रीराम गावडे, विवेक गावडे, सुजित गावडे, अनिल गावडे, शिवराम गावडे, वगैरे बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते त्याच प्रमाणे साळेल गावातील झाशीची राणी ग्रामसेवा संघ साळेल व स्वामी समर्थ ग्रामसेवा संघ साळेल या दोन्ही ग्रामसेवा संघाच्या बचत गटातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
यावेळी आपल्या शाळेतील मुले तसेच गावातील महिला, ग्रामस्थ यांनी शाळा ते सार्वजनिक विहिरी पर्यंत प्रभात फेरी द्वारे जल बचत व जल संवर्धनाचा संदेश देण्यात आला.












