आचरा (प्रतिनिधी) : पळसंब शाळा नं. १ च्या लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारचा लोकार्पण सोहळा गुरुवार 12 मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सचिन माणगांवकर, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून लोकर्पण करण्यात आले. त्यावेळी पळसंब प्रभारी सरपंच अविराज परब, गटशिक्षणाधिकारी मालवण संजय माने, केद्र प्रमुख देऊ जंगले, सरिता पवार, शाळा अध्यक्ष रविकांत सावंत, मुख्याध्यापक विनोद कदम, माजी पंचायत समिती उपसभापती अशोक बागवे, दिगबर साटम, प्रमोद सावंत, सुशोभिकरण अध्यक्ष नारायण सावंत, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश परब, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, पुनम गोलतकर, अनुष्का परब, पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, विपूल जुवेकर, सुरेश गावकर, अरुण पुजारे, राजन पुजारे, अनिल पुजारे, दिवाकर पुजारे, सावंत गुरुजी, राजेद्रप्रसाद गाड, अपूर्वा पवार, माजी शिक्षक श्रीम. सोनगट्टे, श्रीम. गवाणकर, मधुकर परब, विजय पुजारे, दशरथ सावंत, सुनिल मुणगेकर, रमेश मुणगेकर, रामकृष्ण पुजारे, अमरेश पुजारे, अमित पुजारे, प्रमोद पुजारे, अरुण पुजारे, पंचक्रोशीतील शिक्षक ग्रामस्थ महिला मुले मोठया संख्येने उपस्थित होती.
शाळेच्या मुलांनी लेझिन नृत्य सादर करत कार्यक्रमांत शोभा वाढवली तसेच उपस्थित मान्यवरानी पळसंब गावाच्या एकजुटीचे कौतुक करत लोकसहभागातून उभारलेल्या प्रवेशद्वाराचे कौतूक करत असे प्रवेशद्वार मराठी शाळेचे सिंधुदुर्गात कुठे पाहायला मिळाले नाही असे उद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले. रात्रौ 10 वाजता दत्तमाऊली दशावतार नाटय मंडळ यांच्या नाटय प्रयोगाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. त्यावेळी गावातील रहिवाशी मुंबईकर चाकरमानी माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. सर्व दात्याचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.














