कुडाळ (प्रतिनिधी) : समाजाच्या प्रवाहात वाटचाल करताना संघटना वाचवा समाज वाचवा एकत्र या फुटीरवादीना थारा देऊ नका असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी आज केले.
भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्रच्या वतीने संत रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा येथील मराठा समाजाच्या सभागृहात राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष सी आर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी ओरोस पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण समाजाचे पदाधिकारी सुरेश चौकेकर चंद्रकांत चव्हाण अरुण होडावडेकर बाबल पावसकर अनिल चव्हाण संतोष जाधव प्राजक्त चव्हाण मालिनी चव्हाण डॉ प्रतीक्षा चव्हाण यशवंत देवरुखकर भारत पेंडुरकर नामदेव चव्हाण रमेश कुडाळकर भाई पिंगुळकर गुरू पेंटर गुरू तेंडूलकर गणेश चव्हाण कृष्णा चव्हाण मनोहर वालावलकर भूषण चव्हाण अरुण चव्हाण मनिष चव्हाण पदाधिकारी आदी उपस्थित होते.
श्री चव्हाण म्हणाले आपल्या भारतीय चर्मकार समाज संघटनेचे कार्य राज्य पातळीवर सर्वांच्या सहकार्याने जोरदार सुरू आहे गावागावात मेळाव्याच्या माध्यमातून समाज संघटित करण्याचे काम सुरू आहे कोणतीही संघटना सुरू करणे सोपे आहे पण ती टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते न्याय्य हक्कांसाठी मराठा समाज जसा संघटीत झाला त्यांना त्याच्या एकजुटीवर आरक्षण मंजूर झाले आहे अशाच प्रकारची ताकद आपल्यामध्ये पाहिजे अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी आपली संघटना नेहमीच अग्रेसर राहिली आहे समाजाच्या प्रवाहात वाटचाल करताना संघटना वाचवा समाज वाचवा एकत्र या फुटीरवादीना थारा देऊ नका कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर आम्ही आहोत मतभेद विसरा व समाजाच्या सर्वागीण विकासासाठी एका छत्राखाली या असे आवाहन केले जिल्हा अध्यक्ष सी आर चव्हाण यांनी आपला समाज एका छत्राखाली आला पाहिजे तळागाळातील समाज बांधवाचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आमची संघटना काम करत आहे असे सांगितले संतोष जाधव यांनी आपण संत रविदास दिंनदर्शिका प्रकाशन सोहळा केला यासाठी सर्वाचे सहकार्य लाभले यासाठी जो निधी जमा झाला होता त्यातून खर्च होऊन जी रक्कम राहिली त्याचा विनियोग हा समाजासाठी होणार असल्याचे सांगून आपआपसात असणारे अंतर्गत मतभेद दूर करा एकोप्याने काम करा असे आवाहन केले ओरोस पोलिस उपनिरीक्षक श्री चव्हाण यांनी समाजाच्या चांगल्या कार्यासाठी मी नेहमीच तुमच्यासोबत आहे कायदेविषयक मार्गदर्शन निश्चितच केले जाईल असे सांगितले सुरेश चौकेकर चंद्रकांत चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी पोलिस उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन अनिल चव्हाण यांनी केले आभार श्री पेंडूरकर यांनी मानले.