पार्टी नंबर 1 च्या वतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले
कणकवली (प्रतिनिधी) : आयनल येथील श्रीदेव नागेश्वर-पावणाई देवालयात १ ते ८ मार्च या कालावधीत साजरा होणारा वार्षिक होळी उत्सव साजरा करण्यास पार्टी नं. १ चे सुर्यकांत साटम वगैरे ४ यांना कार्यकारी दंडाधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी परवानगी दिली आहे. तर पार्टी नं. २ चे संदेश साटम वगैरे ८ यांना सहभागी होण्यास हरकत नसल्याचेही या आदेशात म्हटले आहे. पार्टी नं. १ च्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
आयनल येथील श्रीदेव नागेश्वर-पावणाई देवस्थानाच्या मानपानावरून गेली अनेक वर्षे वाद सुरू आहेत. यात न्यायालयीन कामकाजेही चालली. यात वार्षिक होळी उत्सवात कोणत्या गटातील मानकऱ्यांनी कोणती देवाची कामे करावीत, याबाबत एकमत होत नसल्याने शांतताभंग व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने दोन्ही गटाला बंदी लावण्याचा अभिप्राय पोलीस निरीक्षकांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
याबाबत सुनावणी होऊन पार्टी नं. १ चे सुर्यकांत साटम वगैरे ४ यांना होळी उत्सव साजरा करण्याची परवानगी कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिली.












