दीपक केसरकर,बबन साळगावकर तब्बल आठ वर्षांनी एकाच मंचावर

निमित्त मालवणी करंडक महोत्सवाचे ; एकमेकांच्या हस्ते दोघांचा सन्मान…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक नगराध्यक्ष पदाची निवडणूक आणि त्यानंतर नगरसेवक पदाची निवड अशा तीन निवडणुकांच्या काळात तब्बल आठ वर्षे एकमेकापासून दूर असलेल्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व आमदार दीपक केसरकर हे एकाच व्यासपीठावर दिसले. दोघांनी एकमेकांचा सत्कार केला हस्तांदोलन केले घरच्या लोकांची विचारपूस करीत तब्बल दीड तासाच्या कार्यक्रमानंतर एकमेकांचा निरोप घेतला निमित्त होतं ते मालवणी करंडक महोत्सवाचे सावंतवाडी येथील ओंकार कलामंच व पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मालवणी करंडक महोत्सवाच्या निमित्ताने समारोपाच्या दिवशी श्री केसरकर यांनी या ठिकाणी भेट दिली व उपस्थित जेष्ठ कलाकारांचा सन्मान केला.तब्बल आठ वर्षांनी श्री केसरकर व साळगावकर एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या यावेळी दोघांनी एकमेकांसह घरच्या व्यक्तींची विचारपूस केली विशेष म्हणजे त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर व उद्योजक चेतन नेवगी मालवणी करंडक समितीचे अध्यक्ष अमोल टेबकर उपाध्यक्ष रुजल पाटणकर दादा मडकईकर आदी यावेळी उपस्थित होते.एके काळचे अत्यंत जवळचे मित्र असलेल्या श्री साळगावकर यांनी 2019 मध्ये नगराध्यक्ष पदाला सोडचिठ्ठी देत त्या ठिकाणी केसरकर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्या ठिकाणी त्यांना अपयश आले होते. त्यानंतर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत पुन्हा त्यांनी नगराध्यक्ष पद निवडणूक लढवली होती नुकत्याच झालेल्या सावंतवाडी पालिकेच्य नुकत्याच झालेल्या सावंतवाडी पालिकेच्या निवडणुकीत श्री साळगावकर यांनी पुन्हा एकदा नगरसेवक पदासाठी आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता मात्र या तीनही निवडणुकांमध्ये त्यांना यश आले नाही.

या सर्व परिस्थिती आमदार दीपक केसरकर यांच्यावर साळगावकर यांनी टीका केली होती त्यामुळे गेले काही दिवस त्यांचे संबंध ताणले होते मात्र अनेक वेळा टीका झाल्यानंतरही आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर देणे टाळले होते त्यांनी त्या ठिकाणी मैत्री जपली होती अशा परिस्थितीत हे दोघे मालवणी करंडक च्या निमित्ताने एकत्र व्यासपीठावर आले ते आता पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा त्या ठिकाणी असलेल्या उपस्थित प्रेक्षकांमध्ये रंगली होती

error: Content is protected !!