कै. आदित्य (बंटी) रावराणे स्मृतिदिनानिमित्त एडगाव येथे मोफत आरोग्य शिबिर; १०० रुग्णांची तपासणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना व वेळेवर निदान झाल्यास अनेक गंभीर आजारांवर मात करता येते,” असे मत वाशीम येथील न्यायाधीश प्रशांत रवींद्र रावराणे यांनी व्यक्त केले. कै.आदित्य( बंटी) अशोक रावराणे यांच्या द्वितीय स्मृती दिनाचे औचित्य साधून आयोजित मोफत आरोग्य शिबिरात सुमारे १००  रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत सभागृह एडगाव येथे आयोजित या आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसंगी, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, चेअरमन संभाजी रावराणे, संजय रावराणे,चेअरमन सुनील रावराणे,  बंटी रावराणे, नंदिनी रावराणे, अश्विता रावराणे, जनरल सर्जन डॉ. विद्याधर तायशेटे, अस्थिरोग तज्ञ डॉ. सर्वेश तायशेटे, डॉ. समीरा रावराणे यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली. या आरोग्य शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, मूलभूत रक्त तपासणी आली. सर्व रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!