माघी गणेश जयंती निमित्त श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर बावशी च्या वतीने धार्मिक उपक्रम

श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर बावशी गावठाणच्या वतीने गणेश जयंती आणि प्रथम वर्धापन दिन होणार साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : बावशी माघी गणेश जयंती निमित्त १२ फेब्रुवारी रोजी श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर बावशी गावठण येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून श्री गणेश दर्शनासह महाप्रसादाचा उपस्थित राहून भाविकांनी लाभ घेण्याचे आव्हान मंडळाचे अध्यक्ष दिपक कांडर यांनी केले आहे. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता गणेश मूर्तीचे पूजन दुपारी आरती तसेच संध्याकाळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसाद व रात्र दहा वाजता सुस्वर भजन होणार असून 13 फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता अभिषेक व पूजन त्यानंतर साडेदहा वाजता होम हवन दुपारी बारा वाजता जन्मोत्सव महाआरती व दुपारी एक ते तीनच्या दरम्यान महाप्रसाद दुपारी तीन वाजता हळदीकुंकू समारंभ सायंकाळी चार वाजता नवस बोलणे सायंकाळी पाच वाजता पालखी प्रदक्षिणा व दिंडी संध्याकाळी सातला दिंडी भजन महाआरती व महाप्रसाद तसेच रात्री साडेनऊ वाजता पारंपारिक डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा श्री प्रमोद हर्यान आणि बुवा श्री प्रकाश पारकर यांची डबलबारी होणार असून 14 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी 11 वाजता अभिषेक व पूजन व दुपारी बारा ते दोन समराधना महाप्रसाद अशाप्रकारे तीन दिवस धार्मिक कार्यक्रम करून माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी श्रीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष यांनी केले.

error: Content is protected !!