पळसंब येथील भजनी बुवा प्रकाश परब यांचे निधन…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब गावठणवाडी येथील रहिवासी भजनी बुवा प्रकाश परब यांचे राहत्या घरी आज पहाटे निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. श्री जयंती देवी प्रासादिक भजन मंडळाची भजनी बुवा म्हणून त्यांनी अनेक वर्षे निस्सीम सेवा करून भजनी मंडळाला नाव लौकिक मिळवून दिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुली असा परिवार आहे. पळसंब देवस्थानचे अध्यक्ष रमेश परब यांचे ते भाऊ होत. त्यांच्या निधनाने परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!