संदेश सावंत कुटुंबियांकडून रामेश्वर चरणी साडेसात किलो चांदीची प्रभावळ अर्पण

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिरवंडे रामेश्वर मंदिर येथे गावचे सुपुत्र संदेश उर्फ गोट्या सावंत, संजना सावंत आणि त्यांची मुलगी सलोनी सावंत यांनी रथसप्तमी च्या शुभ मुहूर्त वर सुरु होत असलेल्या हरीनाम सप्ताह चे औचित्य साधून रामेश्वर चरणी साडेसात किलो चांदीची ” प्रभावळ ” दान केली. यावेळी मनोहर सावंत, महेंद्र सावंत बाबाजी उर्फ दादा मतकार सावंत, सुनील सावंत व इतर मानकरी व भिरवंडे ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या या दाना बद्धल भिरवंडे वासियांनी आनंद व्यक्त केला.

error: Content is protected !!