चिंदर सडेवाडी येथे आज “कुकुटेश्वर महिमा” नावाचा दशावतार नाट्यप्रयोग…!

अथांग मनोज हडकर याच्या वाढदिवसा निमित्त आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी(हडकरवाडी) येथे आज शनिवार 17 फेब्रुवारी रोजी अथांग मनोज हडकर याच्या प्रथम वाढदिवसा निमित्त रात्रौ 10 वाजता श्री दत्तमाऊली पारंपरीक लोककला दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा “खाता खाता कोंबडो होता”, अर्थात “कुकुतेंश्वर महिमा” हा दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे. या नाट्य प्रयोगात नारदाच्या भूमिकेत चारू मांजरेकर तर सिंधुदुर्गातील नामांकित हार्मोनियम वादक संकेत कुडव सहभागी होणार आहेत तरी रसिक प्रेक्षकांनी नाट्य प्रयोगचा लाभ घ्यावा असे आवाहन मनोज हडकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!