पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानने केला संजय आग्रे यांचा सपत्नीक सत्कार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जया एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलभक्तांची मांदियाळी लागते. सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी पत्नी फोंडाघाट सरपंच सौ संजना आग्रे यांच्यासह आणि मुलगा मुलगी व कुटुंबियांसह आज एकादशी दिवशी पंढरपूर मध्ये जात पांडुरंगाचे दर्शन घेतले.विठुरायाच्या दर्शनानंतर देवस्थान कमिटीचे श्री. कोकीळ यांनी आग्रे दाम्पत्याचा शाल श्रीफळ आणि विठ्ठलाची प्रतिमा देत सत्कार केला. यावेळी पंढरपूर चे नगरसेवक डी. राज सर्वगोड उपस्थित होते.

error: Content is protected !!