खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण सभाजी नगर गुरववाडी येथील मूळ रहिवासी तथा मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कट्टर शिवसैनिक श्री सतीश कृष्णा गुरव यांची नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाच्या संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
सतीश गुरव हे खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी विकास मंडळ मुंबईचे सभासद असून या मंडळाच्या वतीने देखील सतीश गुरव यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
“शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी तसेच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी व येथील सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे” नवं निर्वाचित शिवसेना खारेपाटण जि.प.मतदार संघाचे संपर्क प्रमुख सतीश गुरव यांनी सांगितले.तर शिवसेना पक्षाने खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाची आतापासून बांधणी सुरू केली असून सतीश गुरव सारख्या कार्यकर्त्याची या मतदार संघात सप्रक प्रमुख म्हणून निवड केल्यामुळे त्याचा फायदा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला होऊ शकतो असे जाणकारांकडून बोलले जाते.












