दिविजा वृध्दाश्रम असलदे येथे शिवजयंती उत्साहात साजरी

नांदगाव (प्रतिनिधी) : दिविजा वृध्दाश्रम असलदे येथे सोमवारी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिविजा वृद्धश्रमातील आजी आजोबांचा हस्ते दीपप्रज्वलन करून शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी अशा घोषणानी वातावरण शिवमय झाले हाेते.आजी आजोबांनी हातामध्ये झेंडे घेऊन जय जय महाराष्ट्र माझा ‘ हे गीत अगदी मोठ्या आवाजात व चेहऱ्यावर हास्य व हावभाव ठेऊन गीत सादर केले व वातावरण प्रफुल्लीत केले.तसेच आश्रमातील कर्मचारी वर्गाने सामूहिक नृत्य सादर करून आजी आजोबांचे मनोरंजन केले व कार्यक्रमाची सांगता केली.

error: Content is protected !!