वृद्धाश्रमास वृक्ष भेट देऊन जपली सामाजिक बांधिलकी
वैभववाडी (प्रतिनिधी) : कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय,सांगूळवाडी च्या विद्यार्थ्यानी असलदे येथील “स्वस्तिक फौंडेशन” च्या दिविजा वृद्धाश्रम भेट देत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. वृद्धाश्रमातील वृद्धाशि संवाद साधत त्यांना वृक्ष भेट देण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय,सांगूळवाडी च्या विद्यार्थ्यानी एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी केली. गेली सात वर्ष १९ फेब्रुवारीला एखाद्या आश्रमाला भेट देत अनोख्या पद्धतीने महाविद्यालयातर्फे शिवजयंती साजरी केली जाते. त्याप्रमाणे याहीवर्षी कणकवली येथील दिविजा वृद्धाश्रम भेट देत शिवजयंती साजरी करून महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. सदर कार्यक्रमास प्राचार्य वाडेकर सर, प्राध्यापक देवलकर सर, शेटये सर उपस्थित होते.













