कनेडी हायस्कूल येथे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तू वितरण सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी व बालमंदिर कनेडी या प्रशालेमध्ये मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तू वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे माजी संस्थाचालक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेच्या शालेय समितीचे सदस्य बावतीस ॲलेक्स घोन्सालवीस यांच्या मातोश्री कै. मार्शेलिन ॲलेक्स घोन्सालवीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फादर मिलेट डिसोजा (सावंतवाडी मिलाग्रीस चर्च पॅरीस प्रिस्ट ), फादर फ्रान्सिस डिसोजा (वेंगुर्ला चर्च), फादर ऑलविन घोन्सालवीस (मालवण चर्च), फादर आनंद मास्कारेनेज (भिरवंडे चर्च), फादर राॅजर डिसोजा, फादर फॅलिक्स लोबो (मुख्याध्यापक, मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्ला), आनमारी जाॅन डिसोजा (चेअरमन, कॅथाॅलिक अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी), जाॅन घाब्रीयल नोरोन्हा (नगरसेवक मालवण), शैलेश परब (माजी नगरसेवक सावंतवाडी) हे लाभले होते. संस्थेमार्फत या सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ख्रिसमस ट्री देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबई चे माजी संस्थाचालक कै.. सि. स. सावंत (माजी अध्यक्ष, क. ग. शि. प्र. मंडळ मुंबई), कै. मोहनराव मुरारीराव सावंत ( माजी अध्यक्ष, क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई), कै. शांताराम (भाऊ) रामचंद्र सावंत (माजी चेअरमन, शालेय समिती, मा. वि. मंदिर कनेडी), कै. सुरेश शांताराम सावंत ( माजी सरचिटणीस, क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई), कै. एल्. डी. सावंत (माजी चेअरमन, शालेय समिती, मा‌. वि. मंदिर कनेडी), कै. दौलतराव हरिश्चंद्र सावंत ( माजी चेअरमन, शालेय समिती, मा. वि‌. मंदिर कनेडी), कै. चंद्रकांत सदडेकर (माजी विद्यार्थी व प्रतिथयश उद्योजक मुंबई), कै. रमाकांत वाळके (माजी जि. प. सदस्य सिंधुदुर्ग), कै. कैतान मिंगेल बस्ताडकर ( माजी संचालक, क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई), कै. मार्शेलिन ॲलेक्स घोन्सालवीस (सन्मा. श्री‌. बावतीस घोन्सालवीस यांच्या मातोश्री), कै. डी. व्ही‌. सावंत (निवृत्त शिक्षक) या महनीय व्यक्तींच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांच्या कुटुंबीयांना शाल, श्रीफळ, चंदनाचे रोप व सन्मानचिन्ह देऊन कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील १६० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी रू. ४४०/- किंमत असलेल्या टिफिन बाॅक्सचे वाटप करण्यात आले.

‘अर्धवट ज्ञान अतिशय घातक असते. शिक्षणाने मनुष्य ज्ञानी होतो. शिक्षणाशिवाय मनुष्य कधीही परिपूर्ण होऊचं शकत नाही. आपले आयुष्य हे तीन पानांचे असते. त्यातील पहिले व शेवटचे पान देवाने लिहून पाठविलेले असते. पणं महत्त्वाचे मधले पान मात्र स्वतःचं लिहायचे असते. त्यासाठी स्वकर्तृत्व करून दाखवा’ असा संदेश प्रमुख पाहुणे फादर मिलेट डिसोजा यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते या प्रशालेचे माजी विद्यार्थी सुद्धा आहेत. माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या सुंदर प्रशालेत मला शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले याबद्दल त्यांनी परमेश्वराचे आभार मानले. यानंतर फादर फ्रान्सिस डिसोजा, फादर ऑलविन घोन्सालवीस, आनमारी जाॅन डिसोजा यांनी देखील विद्यार्थ्यांना उद्बोधित केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात सतीश सावंत यांनी बावतीस घोन्सालवीस यांना एवढा सुंदर कार्यक्रम घडवून आणल्या बद्दल धन्यवाद दिले. ‘जीवनात निष्ठेने व सचोटीने वागून खूप अभ्यास करा व आपले तसेच आपल्या शाळेचे नाव खूप उज्ज्वल करा’ असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सदर कार्यक्रमास क.ग.शि.प्र.मंडळ मुंबईचे सरचिटणीस सन्मा. शिवाजी सावंत, संचालक संजय सावंत व व्ही. बी. सावंत, शालेय समिती चेअरमन सन्मा. आर्. एच्. सावंत, खजिनदार गणपत सावंत, सदस्य तुषार सावंत व प्रभाकर चांदोस्कर, माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य आनंद सावंत, बारदेसकर , प्रशाला मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशाला मुख्याध्यापक सुमंत दळवी यांनी तर सूत्रसंचलन सहाय्यक शिक्षक प्रसाद मसुरकर यांनी केले.

error: Content is protected !!