चेक बाऊन्स खटल्यातील अजामीनपात्र वॉरंट निघालेल्या आरोपी गुलाम झारीला पोलीस हवालदार रवींद्र बाईत यांनी घेतले ताब्यात

कणकवली न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता

कणकवली (प्रतिनिधी) : लोकमान्य मल्टीपर्पज पतसंस्थेच्या कर्ज परताव्यापोटी दिलेला चेक बाऊन्स झाल्यानंतर कोर्टात सुनावणीला गैरहजर राहिल्यानंतर अजामीनपात्र वॉरंट निघालेल्या आरोपी गुलाम अमरुद्दीन झारी ( वय 48, रा. सोनगेवाडी, कणकवली ) याला कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रवींद्र बाईत यांनी आज ताब्यात घेत कणकवली न्यायालयात हजर केले.गुलाम झारी याने लोकमान्य पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. कर्ज परताव्यापोटी दिलेला चेक बाऊन्स झाला होता. कर्जफेड करण्यास टाळाटाळ केल्यानंतर गुलाम झारी विरोधात खटला दाखल करण्यात आला होता.मात्र सुनावणीस गैरहजर राहिल्यानंतर गुलाम झारी विरोधात अजामीनपात्र वॉरंट कोर्टाकडून काढण्यात आले होते. कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रवींद्र बाईत हे गुलाम झारी च्या पाळतीवर होते.आज 25 फेब्रुवारी रोजी कणकवली येथील आपल्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हवालदार बाईत यांनी गुलाम झारी याला कणकवली शहरात ताब्यात घेत कणकवली न्यायालयासमोर हजर केले. गुलाम झारी याची जामिनावर मुक्तता करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

error: Content is protected !!