कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या पाठीवर सुप्रीम कोर्टाची कौतुकाची थाप
देवगड (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले काम कौतुकास्पद करीत देवगड न्यायालयाच्या ईमारतीचे कोनाशिल कार्यक्रमाला या खात्याने केलेली पुर्व तयारी वाख्यन्याजोग असल्याचे गौरउदगार सर्वोच्च न्यायालयाचे भुषण गवई यांनी काढले. देवगड न्यायालयाच्या ईमारतीचे भुमिपुजन 24 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भुषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष करुन सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या कामगिरीवरती समाधान व्यक्त करुन न्यायमुर्ती गवई यांनी कौतुकाचे थाप सर्वगोड यांची पाठीवरती दिली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे सध्या राज्यात दर्जेदार केली जात आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेही श्रेय आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हे अतिशय चांगल्या पध्दतीने व वेळेत कामे पुर्ण करीत आहेत. कार्यकारी अभियंता कणकवलीचे अजयकुमार सर्वगोड हे देखील चांगल्या पध्दतीने कामे करीत आहेत. त्यामुळे येथील बांधकाम विभागातर्फे करण्यात येणारी कामे हि नियोजनबध्द व दर्जेदार असल्याचे गौरवोदगार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश भुषण गवई यांनी केले.













