कुडाळ (प्रतिनिधी) : १ मार्च रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सन्माननीय चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत “शक्ति बंदन” मेळावा संपन्न झाला याप्रसंगी सोबत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ मालवण प्रभारी निलेश राणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, सावंतवाडी विधानसभा प्रभारी राजन तेली, जिल्हा संयोजक शक्ति वंदन प्रसन्ना देसाई, प्रदेश सरचिटणीस महिला मोर्चा मंजुषा कुढीमोती, उपाध्यक्षा प्रज्ञा ढवण, जिल्हा समन्वयक, आम्रपाली साळवी, अर्चना देसाई, प्रदेश सदस्य, संध्या तेरसे, रश्मी लुडबे, दिप्ती पडते तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी, सर्व मंडल अध्यक्षा, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सिंधुदुर्गातील सामाजिक, औद्योगिक संस्था तसेच महिलांसाठी विशेष काम करणाऱ्या महिलांचा शक्ति संगिनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या चित्राताई वाघ यांनी सिंधुदुर्गच नाही तर कोकण भागातील संस्कृतीचं भरभरुन कौतुक केलं. कोकणात होत असलेलं मुलीच्या जन्माचे स्वागत असो, स्वाभिमानी कोकणी शेतकऱ्याच्या मनातील गोडवा असो, कणखर मेहनती कोकणी स्री असो सर्वांच मनापासून कौतुक केलं. त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग भाजपा टीमचंही कौतुक ताईंनी आपल्या भाषणातून केलं. माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या कामाचा ही आवर्जुन उल्लेख केला आणि त्यांच्याकडून पुढे आलेली धुरा समर्थपणे पेलणार्या विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांचंही काम छान सुरु असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी आणलेल्या सर्व योजना जसं की, मातृवंदना, इज्जत घर, उज्वला गॅस, आयुष्यमान भारत, स्वनिधी कर्ज योजना, लखपती दिदी या योजनांवर सविस्तरपणे चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तुम्ही सर्व माता-भगिनींनी मला निवडून देऊन देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद दिले आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आज तुमच्या जिल्ह्यात आल्याचं ताईंनी सांगितलं.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या लर्निंग लिंक फाउंडेशन च्या माध्यमातून झालेल्या महिला सशक्तकरण कार्यक्रम, जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालेल्या ई-कॉमर्स कार्यशाळा तसेच केंद्रीय मंत्री या, नारायणराव राणेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या ग्रामोद्योग विकास योजना यासर्व उपक्रमांचा आवर्जून उल्लेख केला.
महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यानी जिल्ह्यातील महिलांच्या कामाचा आढावा दिला. तसेच सर्व महिलांच्या वतीने पंतप्रधान मोदीजींनी धन्यवाद देत असताना येणार्या २०२४ लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार भरघोस मतांनी निवडून देत मोदीजींना अपेक्षित ४०० बहुमत शंभर टक्के मिळणार अश्या शुभेच्छा सिधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या वतीने दिल्या, शक्ति वंदना जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई यांचाही सत्कार या, चित्राताई यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बांदा मंडल अध्यक्षा रुपाली शिरसाट यांनी केले व आभार प्रदर्शन कुडाळ मंडल अध्यक्षा आरती पाटील यांनी केले.













