शंकर पार्सेकर शिवसेनेत दाखल ; ठाकरे गटाला हादरा

किरण सामंत यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे माजी कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी रत्नसिंधु समृद्धी योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात पार्सेकर यांनी धनुष्यबाण हाती घेतला. ठाकरे गटाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर पार्सेकर हे काही काळ तटस्थ राहिले होते. आज त्यांनी सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी जिल्हा खजिनदार भास्कर राणे, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, तालुका समन्वयक सुनील पारकर, शहरप्रमुख बाळू पारकर आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!