आम्ही कायमच राणेंसोबत ; उबाठा सेनेच्या पक्षप्रवेशाची केली पाेलखाेल
कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावातील मुस्लिम बांधव तसेच मुस्लिम महिलांनी आज आमदार नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर भेट घेत आपण सर्व मुस्लिम बांधव राणेंसोबत कायम असल्याची ग्वाही दिली. वरवडे चे सुपुत्र असलेल्या केंद्रीयमंत्री नारायण राणे तसेच आमदार नितेश राणे यांनी कायमच स्थानिक मुस्लिम समाजाला सन्मानाची वागणूक दिली आहे. मुस्लिमवाडीतील अनेक विकासकामे ही राणे कुटुंबीयांनी केलेली आहेत. त्यामुळे यापुढेही आम्ही सर्वजण राणेंसोबतच राहणार असल्याचेही यावेळी सांगितले. उबाठा सेनेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या पक्षप्रवेशमध्ये दिलेल्या नावात तथ्य नसल्याचेही यावेळी मुस्लिम बांधवांनी सांगत पक्षप्रवेशाचा बनाव उघड केला.
यावेळी इब्राहिम शेख, नईमा शेख, रेशमा शेख, निसार खोत, रिजवाना खोत, शिका खोत, नासिर खान, एहजास खान, दानिश खान, रुकसाना खान, बानुबी पणलेकर, शानवाज पनलेकर सहित शेख, हफिजा शेख आदी उपस्थित होते.












