राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांना महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन महाराष्ट्र विधान भवन मुंबई येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर उपस्थित हाेते.तसेच या पुरस्काराची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन जून 2044 पर्यंत नेमणुक केली. ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज सध्या कणकवली खरेदी विक्री संघ येथे कार्यरत आहेत.त्यांचे सर्वस्थरातून अभिनंदन हाेत आहे.
महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा पुरस्कार प्राप्त व विशेष कार्यकारी अधिकारी नेमणुक झाल्याबद्दल हं.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांचा महाशिवरात्री दिनी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकाेट संस्थानचे कणकवली तालुका पालखी आयाेजक विश्राम रासम, एस.टी महामंडळ कणकवली डेपाेचे वाहतुक नियंत्रक स्वामी भक्त बाबु मुळदेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.












