भाषणातून व पोवाड्यातून शिवशाही चा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडण्याचा प्रयत्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे शिक्षक वाय.आर. चव्हाण यांनी शिवस्रोत म्हणून तर तुळसणकर सर व उपस्थित सर्व सहकारी शिक्षक व उपस्थित विद्यार्थी यांनी महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एन.व्ही.प्रभु यांनी केले.’शिवजयंती च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिववीचार घेऊन जावे.’ असे ते म्हणाले. त्यानंतर उच्च माध्यमिक विभाग प्रमुख पी.जे.सावंत यांनी आपल्या भाषणात ‘आजच्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा गरज आहे. त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याची आज गरज आहे. शिवाजी महाराजांचे विचार विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आत्मसात करावे अशी इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रशालेचे राज्य पुरस्कार प्राप्त जेष्ठ शिक्षक एस.बी. शिंदे यांनी आपल्या भाषणात ‘कोणताही धर्म वाईट नाही, तर माणसांची वृत्ती महत्वाची आहे. तसेच ब्रिटीशांच्या काळापासून आजही महाराष्ट्र कोणापुढे झुकलेला नाही असे ठणकावून सांगितले. महाराजांची प्रेरणा एक मोठे संघटन निर्माण करु शकते याचा दाखला त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला. त्याचबरोबर शिवशाही चा इतिहास सांगणारा शाहिर पिराजी सरनाईक यांचा पोवाडा विद्यार्थ्यांना ऐकवत त्यातील प्रत्येक चरणाचा अर्थ उपस्थितांना सांगितला. पुन्हा एकदा इतिहासातील सर्व प्रसंग विद्यार्थ्यां समोर उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पोवाडा या काव्य प्रकारातील ताकद विद्यार्थ्यांना यानिमित्ताने अनुभवायला मिळाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी आपल्या भाषणात ‘छत्रपतींची ५० वर्षाची कारकीर्द तरुणांना देखील लाजवेल अशी होती.’ असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाचवी मधील कु.शौर्य पोतदार याने गारद सादर केली. तर ईश्वरी रावराणे हीने प्रतापगडचा पोवाडा सादर केला. कस्तुरी पाटील हीने शिवरायांचा थोडक्यात जिवनपट सांगितला. शिवाजी महाराज महाराष्ट्राची शान आहेत असे मत सृष्टी शेळके हिने व्यक्त केले.तर ‘शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावे लागते. असे कु.चंदना गुरव म्हणाली. शिवानी फुटक हिने शिवरायांचे व्यक्तीमत्व व स्वराज्य याबाबत उपस्थितांना माहिती दिली. शिवाजी महाराजांचा दरारा कायम राहील असे मत ब्रिजेश तुळसणकर याने कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.एस.मरळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आर.बी.जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिवजयंती निमित्त रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या माध्यमातून शिवकालखंडावर आधारित एक बहुपर्यायी परीक्षा घेण्यात आली. वैभववाडी महोत्सव निमित्त आयोजित वेशभूषा स्पर्धत ‘वैभवकन्या’म्हणून प्रथम मान मिळवलेल्या विद्यालयाच्या भक्ती पाटील हिचा यावेळी प्रशालेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवजयंती निमित्त प्रशालेचे शिक्षक व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे कार्यक्रमाला अधिक शोभा आली.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, जेष्ठ शिक्षक व प्रमुख वक्ते एस.बी.शिंदे., माध्यमिक प्रमुख एस.एस.पाटील, उच्च माध्यमिक प्रमुख पी.जे.सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.एस.चोरगे, वाय.जी.चव्हाण, तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












