लोरे विविध कार्यकारि सोसायटी चेअरमन पदी सुनील रावराणे यांची बिनविरोध निवड

कणकवली (प्रतिनिधी) : लोरे विविध कार्यकारी सोसायटी रिक्त असलेल्या चेअरमन पदाची निवडणूक दिनांक 16 ऑगस्ट रोजी निवडणूक अधिकारी अमोल बिराजदार (अध्यासी अधिकारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग ) यांच्या अध्यक्षतेखाली लोरे विविध कार्यकारी सोसायटी कार्यालय येथे संपन्न झाली. या निवडणुकी मध्ये सुनील मधुकर रावराणे यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड करण्यातआली. या प्रसंगी तुळशीदास रावराणे (सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग )सर्व लोकांना एकत्र घेऊन काम करावे व संस्थेला वेळो वेळीआपले मार्गदर्शन लाभेल अशी ग्वाही देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी मनोज रावराणे(जिल्हा परिषद सदस्य ), सुमन गुरव, नरेश गुरव, अजय रावराणे(सरपंच लोरे ), विठ्ठल मांडवकर, गुरुनाध रावराणे, सीताबाई जाधव,हरिश्चंद्र मोसमकर, रघुनाथ रावराणे, मारुती रावराणे, प्रकाश रावराणे, विलास रावराणे, अनंत रावराणे, उत्तम रावराणे,रेश्मा रावराणे, सचिन सावंत.

error: Content is protected !!