भारतीय मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल च्या हस्तक्षेप शिबिर जी२० शिबिरात सन्मान !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : जन्मत: च एखाद्याला दैवी देणगी मिळाली असते. गडमठ सारख्या डोंगराळ, तरीही मागास असलेल्या खेड्यावाडीवरून, विकासाच्या उंबरठ्यावरील फोंडाघाट गावात किशोर विलास सुतार येतो. आणि तेथे त्याला मारुती मेस्त्री सारखा कसदार,अभ्यासू गुरु मिळतो. अन् किशोरची हस्तशिल्पकला बहरू लागते.आकार घेते. आज येणाऱ्यां नागपंचमीचे औचित्य साधून त्याने शिसम प्रकारच्या लाकडामधून १९ इंच उंची आणि ११ इंच रुंदीचा, हाती डिझाईन केलेला नागोबा पंचक्रोशीमध्ये सर्वांचेच आकर्षण ठरला आहे. जिवंत कलाकारीने, नागोबाच्या हस्तशिल्पाचा सर्वत्र बोलबाला आहे. किशोरची शिल्पकला गुरु मारुती मेस्त्री यांच्या व स्वतःच्या घरी फुललेली पहावयास लोक लांबून येतात. हाती शिल्पकलेच्या आविष्काराने यांच्या तोंडून किशोर चे कौतुक सहज बाहेर पडते …
जन्मताच किशोरच्या पायाला अपंगत्व आले. पखवाज वादन, वारकरी भजन,अभंग यामध्ये सुद्धा किशोर पारंगत आहे. घरात सुतारकीचा इतिहास ! आजोबा,वडील विलास यांच्या हाताखाली लहान मोठी घराची छप्पर, दरवाजे, खिडक्या, खुर्ची- टेबल इत्यादी लाकूड कामे तो शिताफिने करू लागला. मात्र त्याचे मन पारंपारिक सुतार कामापेक्षा लाकूड कामावरील नक्षीदार कलाकुसर,त्यातील सहजता, जिवंतपणा याकडे आकर्षित झाली.अपंगत्वावर मात करीत नवीन जमान्यातील वेगवेगळे तंत्रज्ञान, मशनरी, आणि एकाग्रता, जिद्द, परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी तयार केलेले स्टॅच्यू, खेळणी, घरगुती सामान, दरवाजे,देवालय, मुर्त्या, सर्वांना प्रेक्षणीय तर ठरल्या. कलावती आई मंडळाच्या भजनाचे सिंहासन सुद्धा त्याच्या कलाकुसरीतून लोकांच्या पसंतीस उतरले आहे.परंतु त्यातून आपली संस्कृती, जीवनमान, लोककला, दाखवण्याचा त्याचा प्रयत्न सर्वांनाच आकर्षित करणारा ठरला आहे …
सन २०२५ मध्ये फोंडाघाट येथे पार पडलेल्या भालचंद्र महाराज कला मंच फोंडाघाट आणि हॅंडीकॅप सर्विस सेंटर कोल्हापूर व भारत मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल त्या संयुक्त विद्यमाने,घेण्यात आलेल्या कार्यशाळेत किशोरने विविध खेळणी, सामान, वाहने, स्टॅच्यू इत्यादी मधून आपल्या हस्तशिल्प कला आणि कल्पनाशक्तीची चुणूक दाखवली.त्याचा सर्व अधिकारी आणि विभागाकडून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मात्र पुढे प्रशासनाच्या हँडीक्राफ्ट विभागाकडून किंवा टेक्स्ट. मिनिस्ट्री कडून कोणतेही सहकार्य योजना अथवा प्रोत्साहन मिळाले नाही.संपर्कही ठेवला नाही. अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. वैभववाडी येथे त्यांनी आपले वर्कशॉप सुरू केले असून तिथेही किशोर विद्यार्थी घडवीत आहे. घरच्यांचे तसेच सर्वांच्या सहकार्यांने,भविष्यात हस्तशिल्प कला यामध्येच आपले आयुष्य आणि करिअर करण्याचा त्याचा मानस असून नाविन्यपूर्ण कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा सदैव प्रयत्न राहील असेही त्यांनी शेवटी अस्वस्थ केले..














