भरधाव कारच्या धडकेत वृद्ध पादचाऱ्याचा मृत्यू

कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ सांगिर्डेवाडी येथे कणकवली येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची पादचारी सूर्यकांत रामचंद्र परब (६५, रा. कुडाळ सांगिर्डेवाडी) याना धडक बसली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपाचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर नंदकिशोर विठ्ठल परब यानी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली असून कारचालक ब्रिजेश भानू सिनारी ( रा. मडगाव – गोवा) याच्यावर या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल रात्री ८.१५ वाजल्यानंतर ते आपल्या तेथील मूळ घराकडून मुबई गोवा महामार्गाच्या पलीकडे गुढीपूर येथे राहत असलेलां त्यांचा पुतणा मनोदय (उदय) मनोहर परब यांच्याकडे जायला चालत जात होते. महामार्गावर सांगिर्डेवाडी श्री वरंडेश्वर मंदिर येथून महामार्ग ओलांडत होते. त्यांनी दोन लेन ओलांडल्यावर दुभाजकाच्या दिशेने तिसऱ्या लेनवर गेले असता, कुडाळहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा नेक्सोन कारची सूर्यकांत यांना धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पिचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परतू उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटना समजताच स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे, हवालदार दयानंद चव्हाण व सहकाऱ्यांनी पंचनामा केला. गुरुवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्राची तनपुरे यानी विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रस्त्यांच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने वाहन चालवून सूर्यकांत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कारचालक ब्रिजेश सिनारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

error: Content is protected !!