थकीत करबाकी विरोधात मालवण नगरपालिका आक्रमक

चार मालमत्ता केल्या सील

मालवण (प्रतिनिधी) : पालिका हद्दीतील नागरिकांना विहित पद्धतीने मालमत्ता मागणी देयके बजावून तसेच वेळोवेळी जाहीर आवाहन करुनही थकित मालमत्ता कर न भरल्याने पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज शहरातील चार मालमत्ता सीत करून २ ताखाच्या थकीत कराच्या मालमत्ता गोठविण्यात आल्या.

पालिकेच्या मालमत्ता वसुली पथकातील महेश परब, सोनाली हळदणकर, सुधाकर पाटकर, श्रध्दा आरेकर, भास्कर राऊळ, बस्त्याव फनांडिस, विश्राम जाधव, सचिन कासले यांच्यामार्फत शहरातील बार मालमत्तांना सील ठोकण्यात आले. पापुढेही थकित मालमत्ता नकनेक्शनधारकांवर सील ठोकणे, जप्तीची कारवाई पालिकेमार्फत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

error: Content is protected !!