रेकॉर्डवरील गुन्हेगार आरोपीस पकडुन 75,000/- रुपये किंमतीची मोटर सायकल केली जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीचे गुन्ह्यात वाढ झालेने घडलेले गुन्हे उघडकीस आणणेकामी तसेच घडणारे गुन्ह्यांना प्रतिबंध होणे करीता पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित साो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. वरीष्ठांकडून प्राप्त झाले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांनी त्यांचे शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार करुन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार संजय कुंभार, प्रशांत कांबळे व राजू कांबळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष बाबूराव बिरंबोळे (रा. गुरूकन्नाननगर, लिंबू चौक, इचलकरंजी) याचेकडे चोरीची अॅक्टीव्हा मोपेड असून तो सदरची अॅक्टीव्हा मोपेड घेवून दि. 23.03.2024 रोजी कबनूर ता.हातकणंगले जि.कोल्हापूर गावचे हद्दीत कबनूर ओढयाजवळ येणार आहे. अशी माहिती मिळालेने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे वरील पोलीस पथकाने नमुद ठिकाणी सापळा लावून आरोपी नामे संतोष बाबूराव बिरंबोळे, व. व. 29, (रा.गुरूकन्नाननगर, लिंबू चौक, इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर, मुळ रा. मडिलगे खूर्द, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) यास त्याचे कब्जातील चोरीचे काळे रंगाचे अॅक्टीव्हा मोपेड क्र. एमएच-09- डीके- 3263 सह ताब्यात घेतले. त्याचे कब्जात मिळालेले अॅक्टीव्हा मोपेडबाबत चौकशी केली असता ती चोरीची असून नमुद मोटर सायकल चोरीस गेले बाबत इचलकरंजी पोलीस ठाणे, गु.र.नं.107/2024, भा.द.वि.स. क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल असलेची खात्री झाली. म्हणून आरोपीस पुढील कायदेशिर कारवाई करीता इचलकरंजी पोलीस ठाणे येथे जमा केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खोटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच पोलीस अमंलदार संजय कुंभार, प्रशांत कांबळे, राजू कांबळे, वसंत पिंगळे व संजय पडवळ यांनी केली आहे.

error: Content is protected !!