कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी एकनाथ रामचंद्र राऊळ !

आचरा (प्रतिनिधी) : कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी एकनाथ रामचंद्र राऊळ यांची निवड करण्यात आली आहे. एकनाथ राऊळ यांनी रिक्षा चालक-मालक संघटना वेंगुर्ले या संघटनेचे नऊ वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच गेली 28 वर्षे ते रिक्षा संघटनेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचे मोठे योगदान आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर व उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शना नुसार कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर यांनी एकनाथ राऊळ यांची कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष म्हणून निवड जाहीर करुन अभिनंदन केले आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!