युवा महाराष्ट्राभिमान सोहळ्याला ओव्हरफ्लो गर्दी

युवासेना मेळावा ठरतोय उच्चांकी गर्दीचा

विनायक राऊत यांच्या विजयासाठी मविआ ची युवाशक्ती एकवटली

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मधील महालक्ष्मी हॉलमध्ये घेण्यात आलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग क्षेत्रातील युवासेनेच्या महाराष्ट्राभिमान मेळाव्याला ओव्हरफ्लो गर्दी झाली असून हॉल खचाखच भरून गेला आहे. मविआ च्या युवासैनिक आणि युवा कार्यकर्त्याच्या उच्चांकी गर्दी मुळे केवळ हॉल भरून गेला नसून हॉलबाहेरही 200 हुन अधिक युवा कार्यकर्ते उपस्थित आहेत. शिवसेना युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभेचे मविआ चे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयी संकल्पाचा युवा महाराष्ट्राभिमान मेळावा कुडाळ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राजापूर चे आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

error: Content is protected !!