कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी घुणकीकर यांचे नागरिकांना आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : वनपरिक्षत्रतील कणकवली,वैभववाडी,देवगड तालुक्यात वन्य प्राणी यांचा वावर वाढत असल्याने लोकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच लोकांनी सावधानता घ्यावी याचा प्रसार करणेसाठी तिन्ही तालुक्यात विविध प्रकारची माहिती पत्रक वाटून व बॅनर लावून वन विभागाकडून प्रसार करण्यात येत आहे.पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीच्या जवळ येण्याची शक्य असल्यामुळे दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वतची काळजी घ्यावी .आणि आगी न लावता वनांचे संरक्षण व वन्यप्राण्यांचे सौरक्षण करावे.आणि वनविभागाच्या आधिकरी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन कणकवली वनक्षेत्रपाल श्री.राजेंद्र घुणकीकर यांनी केले आहे.