आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
कणकवली (प्रतिनिधी) : बिडवाडी येथील उबाठा सेनेचे माजी शाखाप्रमुख व माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष पांडुरंग आत्माराम मगर व रामचंद्र घाडी यांनी ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, सुरेश सावंत, संदीप सावंत, बिडवाडी सरपंच पुजा चव्हाण, अनुष्का चव्हाण, प्रशांत चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, आनंद साटम, संजय साळसकर, अनंत मगर, ओमकार चव्हाण,सोमनाथ चव्हाण, रवींद्र तेली, रमेश जांभवडेकर उपस्थित होते.











