शिवसेना (उबाठा) अल्पसंख्यांक उपतालुका प्रमुख पदी उत्तम तांबे यांची निवड

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र

नांदगाव (आनंद तांबे) : लोकसभा निवडणुकीच्या कणकवली तालुका प्रचारात दरम्यान नांदगाव पंचक्रोशीतील खळा बैठकीत खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक उपतालुका प्रमुख पदी उत्तम तांबे यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले

यावेळी उपस्थित खासदार विनायक राऊत,सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा युवा प्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, विधानसभा मतदारसंघ युवक राष्ट्रवादी अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, उप तालुका प्रमुख प्रदीप हरमलकर, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, जिल्हा महिला प्रमुख निलम पालव, तालुका संघटक राजू राठोड, विभाग प्रमुख बाबू पेडणेकर, उपविभाग प्रमुख तात्या निकम, युवा उपतालुकाप्रमुख आबू मिस्त्री, युवा उपविभाग प्रमुख जयप्रकाश पाताडे, असलदे सरपंच चंद्रकांत डांबरे, असलदे शाखाप्रमुख संजय डगरे, कोळशी शाखाप्रमुख संदीप शिंदे, नांदगाव शाखाप्रमुख हनुमंत म्हसकर, माजी विभाग प्रमुख भाऊ रांबाडे, ज्येष्ठ शिवसैनिक अतुल सदडेकर,आणि असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत खळा बैठक पार पडली.

error: Content is protected !!