गांजासह धारदार गुप्ती जप्त ; भुईबावडा चेकपोस्टवर एस एस टी पथक आणि वैभववाडी पोलिसांची कारवाई

कोल्हापूर जिल्ह्यातील तिघा युवकांना अटक

वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा रिंगेवाडी येथील तपासणी नाक्यावर कोल्हापूरहून भुईबावड्याकडे येणाऱ्या  मोटार सायकलस्वारांकडून ११९. २७ ग्रॕम, वजनाचा १ हजार ७०० रुपये किंमतीचा गांजा व एक गुप्ती तसेकंग मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.  ही कारवाई एस एस टी पथक आणि वैभववाडी पोलिसांकडून सोमवार 1 एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजता करण्यात आली. या गुन्ह्यात  आरोपी सौरभ संजय साळुंखे वय २३ , मंजुनाथ रामाण्णा कोरवी वय २४ दोघे रा. मोरेवाडी गणेश काॕलनी, करवीर कोल्हापूर, तसेच रवी राजू भोसले वय २३ रा. राजेंद्र नगर झोपडपट्टी, करवीर कोल्हापूर या तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भुईबावडा रिंगेवाडी येथे तपासणी नाका सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी पोलिस काॕ.हरिश्चंद्र तात्याराम जायभाय, निवडणूक तपासणी नाका प्रमुख महादेव शहादेव केकाण, रामहरी मधुकर बेर्डे, छायाचिञकार तुषार कृष्णांत कुंभार हे ड्युटीवर होते. सोमवारी पहाटे कोल्हापूरहून भुईबावड्याच्या दिशेने एका मोटारसायकलवरुन तिघेजण येत होते. पोलिस जायभाय यांनी त्यांना थांबवित चौकशी केली. संशय आल्याने त्यांची झडती घेतली असता,त्यांच्याकडे १ हजार ७०० रुपये किंमतीचा ११९.२७ ग्रॕम गांजा व एक गुप्ती सापडली. याबाबत जायभाय यांनी  वैभववाडी पोलिस ठाणेत माहीती दिल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल अवसरमोल, पोलिस शैलेश कांबळे, अभिजीत तावडे, जुजे फर्नांडीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपी सौरभ संजय साळुंखे वय २३ , मंजुनाथ रामाण्णा कोरवी वय २४ दोघे रा. मोरेवाडी गणेश काॕलणी करवीर कोल्हापूर, तसेच रवी राजू भोसले वय २३ रा. राजेंद्र नगर झोपडपट्टी, करवीर कोल्हापूर या तिघांना मुद्देमालसह ताब्यात घेत वैभववाडी पोलिस ठाण्यात आणले.

गांज्या अंमली पदार्थ प्रशान करण्यासाठी बाळगल्या स्थितीत तसेच विनापरवाना गुप्ती बाळगले प्रकरणी मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम २७/२९ व शस्ञ अधिनियम ४/२५.भादवी कलम ३४ नुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी दुपारी आरोपींना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले आहे. अधिक तपास वैभववाडी पोलिस करीत आहेत.

error: Content is protected !!