रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या कणकवलीतील एकाला रेल्वे पाेलिसांकडून अटक

कणकवली (प्रतिनिधी) : रेल्वेच्या तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या शहरातील एका दुकानात कामास असलेल्या संशयित युवकास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास केली. या कारवाईमुळे रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

शहरातील एका दुकानात काम करत असणारा व्यक्ती रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी सोमवारी दुपारी शहरातून एका संशियत युवकास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलिसांनी कणकवली रेल्वे स्थानकातील आरसीएफच्या कार्यालयात चौकशीसाठी नेले. त्याठिकाणी त्याची चौकशी सुरु होती. सदर युवकाकडून रेल्वेच्या तिकिटाचे काळाबाजार करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रेही पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी सदर युवकाची पोलिसांकडून चौकशी सुरु असून चौकशीअंती त्यालान्यायालयात हजर केले जाणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या कारवाईमुळे रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. काहीमहिन्यांपूर्वी गोव्यातील आरसीएफ पोलिसांनी सावंतवाडी शहरात छाप्पा टाकूनरेल्वेच्या तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या एका युवकास ताब्यात घेतले होते.या घटनेची माहिती समजली तेव्हा काहींनी एप्रिल फूल चा भास म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र सायंकाळी याबाबात सबंधित प्रकाराची माहिती घेतली असता ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.

error: Content is protected !!