खारेपाटण येथील मतदान केंद्रांना सदिच्छा भेट देत

प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांचा घेतला आढावा

खारेपाटण (प्रतिनिधी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर आज कणकवली प्रांत अधिकारी तथा,कणकवली,देवगड, वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री जगदीश कातकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावातील शेठ न.म.विद्यालय खारेपाटण येथील मतदान केंद्र क्र.२६८/१९९ व २६८/२०० याना सदिच्छा भेट देत प्रत्यक्ष मतदान केंद्र ठीकानांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व देवगड तहसीलदार संकेत यमगर आदी अधिकारी उपस्थित होते.

प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांनी खारेपाटण हायस्कूल येथील दोन प्रमुख मतदान केंद्राची पाहणी केल्यानंतर काही मार्गदर्शक सूचना निवडणुकीशी सबंधित अधिकारी कर्मचारी वर्गाला केल्या. यावेळी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप सर यांनी प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी शाळेचे शिक्षक गुरसाळे सर खारेपाटण सर्कल एस आर बावलेकर,कोतवाल गुरसाळे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सद्या ॲक्शन मोड वर असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ अंतर्गत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात येणाऱ्या एकूण ६ विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्राचा आढावा घेतला जात असून निवडणूक कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी सुष्म नियोजन आखले जात असल्याची माहिती यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!