राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी राज्य संघाच्या स्टार कबड्डी खेळाडू म्हणून निवड
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील जाणवली गावातील शेतकरी कुटुंबात जन्म झालेला सिंधुदुर्ग जिल्ह्याला भूषण वाटावे असे जाणवली गावातील चमकता हिरा प्रणय राणे याची देशाच्या 70 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाच्या स्टार कबड्डी खेळाडू म्हणून निवड झाली आहे.ते मुंबईहून आपल्या जाणवली गावी आल्यावर गावच्या वतीने व यंगस्टार क्रीडा मंडळ कणकवलीच्या वतीने बाईक रॅली काढून प्रणय राणेचे भव्य स्वागत करण्यात आले.
तसेच स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट संस्थानचे कणकवली तालुका पालखी आयोजक विश्राम विश्वनाथ रासम यांच्या पुण्याई प्रासाद या निवासस्थानी प्रणय राणे याचा श्री स्वामी समर्थ दरबारामध्ये एका छोट्या खाणी कार्यक्रमामध्ये विश्राम रासम यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ, श्री स्वामीचे कृपा वस्त्र घालून कबड्डी पटू प्रणय राणेचा यथोचित सत्कार केला.











