हिम्मत असेल तर उबाठा ने काँग्रेसशी फ्रेंडली फाईट करावी
आमदार नितेश राणेंनी उबाठा च्या जखमेवर चोळले मीठ
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) :सांगली आणि भिवंडी त एकमत होत नसेल तर फ्रेंडली फाईट करण्याचा प्रस्ताव काँग्रेस ने उबाठा ला दिला आहे, त्यावरून संजय राऊत आणि मालक उद्धव ठाकरे यांची हातभर फाटली आहे. जर स्व. बाळासाहेबांचे रक्त आणि बाणा उद्धव ठाकरेंत असेल तर हिम्मत दाखवून ही फ्रेंडली फाईट करावी असे आव्हानच भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेला दिले. ज्या सांगलीत तोंड काळे करत राऊत फिरत आहे तेथे काँग्रेस चे वसंतदादा पाटील सारखे जेष्ठ नेते होऊन गेले. उद्धव ठाकरेंची हवा असल्याचे राऊत भासवत आहे. आहे हिम्मत तर द्या फ्रेंडली फाईट आणि सिद्ध करा की तुमच्या अंगात बाळासाहेबांचे रक्त आहे. राज्यात 40 प्लस चा दावा करणाऱ्या राऊत ने सांगलीत जर काँग्रेस ने आमची कोंडी केली तर राज्यात काँग्रेसची कोंडी करू या राऊत यांच्या इशाऱ्यावरून जर हिम्मत असेल तर फ्रेंडली फाईट करावी. राज्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असा मार्मिक टोला नितेश राणे यांनी लगावला.












