कणकवली (प्रतिनिधी) : आशिये-बाणेवाडी येथील रहिवासी अशोक दत्ताराम बाणे (52) यांचे सोमवार सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते कलरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन भाऊ, भावजया, बहीण, भावोजी, पुतणे, पुतणी, आत्या असा मोठा परिवार आहे. भाऊ संतोष व मनोहर बाणे यांचे ज्येष्ठ बंधू होत.
अशोक बाणे यांचे निधन











